पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथे ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग या विषयावर आदर्श सरपंच व्याख्यान व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाडी शेवाळे भुमिपूजन सोहळा झाला संपन्न –भास्करराव पेरे यांची प्रमुख उपस्थिती
तसेच पहिल्यांदा शेवाळे गावातील ग्राम पंचायत ला भेट देऊन पेरे साहेबांनी गावाचे सरपंच व गावाची ओळख करतांना गाव आदर्श गावाच्या वाटेवर असल्याचे नमूद केले, आणि सरपंच योगेश पाटील यांचे विशेष कौतुकही केले, त्या नंतर शेवाळे गावात साईबाबा मंदिर परिसरात निंब, पिंपळ, वड रोप लाऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला व वाडी शेवाळे येथे येऊन समशान भुमिचे परिसरात निंब, पिंपळ, वड, असे वृक्षरोपण करून, ग्रा.प.वाडी-शेवाळे यांच्या वतीने मा.श्री.आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील साहेब यांचे ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते, पेरे यांनी अतिशय योग्य पद्धतीने व सुटसुटीत मुद्दे मांडून गावाचा विकास कसा करता येईल हे समजून सांगितले,
पेरे सरांच्या व्याख्यानाने गावाचा विकास करण्यासाठी वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. या प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील, खासदार उन्मेष दादा पाटील, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्यासह जि.प.सदस्य मधुकर काटे, जि.सदस्य पदमबापू पाटील. पंचायत समितीचे सदस्य, सुनिल पाटील,
शेवाळे गावचे सरपंच श्री. योगेश कौतिक पाटील उपसरपंच शांताराम वाघ, ग्रामपंचायत सदस्य लताताई विश्वासराव भोसले, भागाबाई मांगगारोडी, सुनीता पाटील, अनिल पाटील, श्रीकांत पाटील, जयश्री भगूरे, नपिसा तडवी, ग्रामविकास अधिकारी संजय जाधव, पो.पा.अरुण पाटील, भगवान पांडे, व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते, तसेच वाडी गावचे सरपंच रेखाताई नंदू पाटील, उपसरपंच सोपान ठोबरे, ग्रा.प.सदस्य प्रकाश भाऊ पाटील, गणेश गव्हांडे, dr.शेखर पाटील, प्रवीण मिसाळ, समाधान देवरे, सीमा जगदीश पाटील, संध्या प्रकाश पाटील, लताबाई गणेश पाटील, नंदुभाऊ वामन पाटील, ग्रामसेवक संजय चौधरी, माजी सरपंच रमेश नाना पाटील, तसेच आर्मी ग्रुप व कर्मचारी विवीध गावांचे सरपंच, उपसरपंच तसेच,पंचक्रोशीतील कार्यकर्ते ,ग्रामस्थ उपस्थित होते.