बीड जिल्हाबीड तालुकामहाराष्ट्र राज्यमांजरसुंबा

चौसाळ्यात दारूच्या नशेत मुलाने केला आईचा खुन

बीड:नानासाहेब डिडुळ― शुक्रवारी रात्री दारूच्या नशेत असलेल्या मुलाने आईला बेदम मारहाण केली. यामध्ये सदर महिलेचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. ही घटना चौसाळा येथे घडली.आईचा जीव गेल्याचे लक्षात येताच मुलाने पळून जात सासरवाडी गाठली. आरोपी मुलास पोलिसांनी पाठलाग करत तात्काळ अटक केली.
चौसाळा येथील प्रयागबाई पांडुरंग मानगिरे वय70 वर्षे या महिललेचा मुलगा मदन पांडुरंग मानगिरे वय 28 वर्ष जागा विकली त्या पैशाचा माझा मला हिस्सा दे असे म्हणत दारूच्या नशेत नेहमीच मारहाण करत असे. चौसाळा पोलीस चौकीत नेहमी यासंदर्भात तक्रार केली जायची. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमूळे या प्रकरणावर पांघरून घातले जायचे. शुक्रवारी देखील असाच नेहमीप्रमाणे प्रकार घडला. मदन मानगिरे याने आई प्रयागबाई हिला बेदम मारहाण केली. या जबरदस्त झालेल्या मारहाणीत तिचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान आजूबाजूच्या लोकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर व मुलाची दारूची नशा कमी झाल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच एपीआय विलास जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी आरोपी सासरवाडी असलेल्या महाकाळा येथे पळून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पीएसआय लक्ष्‍मण केंद्रे यांनी तत्परता दाखवत स्वतःच्या खाजगी वाहनाने पाठलाग सुरू केला दरम्यान आरोपी मदन यास दुचाकीवरून लहान मुलासह पळून जात असताना शहागड जवळ पकडण्यात आले. यामध्ये मृत महिलादेखील नेहमीच दारू पित असल्याचं सांगितले जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा नोंद केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Back to top button