Last Updated by संपादक
घोसला:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गावाच्या लोकसंख्येपेक्षा ७० टक्के ग्रामस्थांचे लसीकरण करून घेणे,गावात मास्कचा वापर अनिवार्य करून ग्रामस्थांना कोविड पासून सुरक्षित करण्याची जबाबदारी महिला सरपंच सुवर्णाबाई पाटील यांनी चोखपणे पार पडल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सर्वेक्षणात निदर्शनात आल्यावरून घोसला ग्राम पंचायतीच्या सरपंच सुवर्णाबाई पाटील यांना जिल्हा प्रशासनाने कोविड योद्धा म्हणून गौरविले आहे.त्या पुरस्काराचे विवरण शुक्रवारी सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत यांच्या हस्ते करण्यात आले आहे.पहिल्यांदाच सरपंच पदी विराजमान झाल्यावर सरपंच सुवर्णाबाई पाटील यांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी पार पाडल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले यावेळी नायब तहसीलदार विठ्ठल जाधव,गोरखनाथ सुरे आदींची उपस्थिती होती.