पालघर जिल्हा

पालघर देवा ग्रुप फाऊंडेशन ची बैठक संपन्न ; लवकरच पाठींबा कुणाला ते जाहीर होणार

देवा ग्रुप ची मतं निर्णायक ठरतील- तानाजी मोरे

पालघर दि.२९ मार्च :आज देवा ग्रुप फाऊंडेशनची पालघर जिल्ह्याची बैठक आज पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवा ग्रुप फाऊंडेशनच्या या बैठका राजकीय वातावरण ढवळून काढत आहेत. परवा झालेली ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभेची बैठक आणि आज झालेली पालघर लोकसभेची बैठक लक्षवेधी आहे. या बैठकीत पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते, प्रत्येकाने आपले मत मांडले आणि अंतिम निर्णय ग्रुप च्या कोअर कमिटीवर ठेवला आहे.मात्र भिवंडी,पालघर ठाचे,कल्याण यांसारख्या काही ठराविक मतदारसंघात देवा ग्रुप कडे तरुणांचा मोठा फौजफाटा आहे,त्यामुळे देवा ग्रुप ची मतं या सगळ्या मतदारसंघात निर्णायक ठरतील असे मत यावेळी देवा ग्रुप फाऊंडेशनचे राज्य सचिव तानाजी मोरे यांनी केले. देवा गृप ची सर्व सभासद तरुण मंडळी योग्य उमेदवारासाठी मेहनत घेऊन विजयापर्यंत पोहचवितील असा विश्वास कार्याध्यक्ष सुरेंद्र गुळवी, जिंदर दहिवाल यांनी व्यक्त केला.यावेळी जितेश (बंटी) पाटील हे देखील उपस्थित होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    पालघर मध्ये देवा ग्रुप युती चे राजेंद्र गावित की बहुजन विकास आघाडी आणि मित्र पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या संयुक्त उमेदवारास मदत करेल याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र देवा ग्रुप फाऊंडेशनची सभासद तरुण मुलं ही याभागात गावागावात आहेत, त्यामुळे यांच्या निर्णायक मतांचा कार्यकर्त्यांच्या टीम चा चांगला उपयोग उमेदवाराला होऊ शकेल, आता कोणता उमेदवार ही हजारो मतं आणि तरुणांची टीम आपल्या सोबत घेण्यात यशस्वी ठरतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची मत आणि इथली राजकीय परिस्थिती याचा अंदाज घेऊन निर्णय जाहीर करणार असल्याचे यावेळी सांगितले गेले.
    देवा ग्रुप चे वसई विरार पालघर डहाणू तलासरी जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा असे सर्व तालुक्यातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, पालघर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रफुल सानप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मोहिनी चौधरी ,किरण खरपडे उमेश पाटील, गिरीश बांगर, प्रल्हाद बोडके ,सुशांत धानवा, सचिन पाटील, धिरज भोईर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.