बीड:नानासाहेब डिडुळ(उपसंपादक)― बीड जिल्ह्य़ातील नरेगा गैरव्यवहार प्रकरणात उच्च न्यायालयाने घोटाळा प्रकरणात चौकशीकडे दुर्लक्ष केल्याने बदली करण्याचे आदेश दिले होते. त्यातच बीड जिल्ह्य़ातील कोरोना कालावधीत बोगस कुटुंब दाखवुन त्यांच्या नावाने कागदोपत्रीच कामे दाखवुन कोट्यावधी रूपयांचा अपहार सरपंच, ग्रामसेवक, तसेच प्रशासकीय आधिकारी यांनी संगनमतानेच केला असून संबधित प्रकरणात गुन्हे दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात यावी.
केज तालुक्यातील लहुरी नरेगा गैरव्यवहार प्रकरणात फौजदारी कारवाई करावी
केज तालुक्यातील लहुरी ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा कामात मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला असून संबधित प्रकरणात सरपंच, ग्रामसेवक, तसेच पंचायत समिती गटविकास आधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्यामार्फत रोहयो मंत्री, प्रधान सचिव रोहयो मंत्रालय, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.