औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव तालुक्यात नुकसानीचा सडा ,पावसाच्या उघडिपीनंतर कपाशीच्या कैऱ्यांची गळ

सोयगाव,ता.२३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सलग पाच दिवसाच्या पावसाने सोमवारी उसंत देताच चटकलेल्या उन्हात सोमवारी अचानक कपाशी पिकांच्या कैऱ्यांचा सडा आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे,या बाबत मात्र तालुका कृषी विभागाकडून कोणतीही पाहणी करण्यात आलेली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

सोयगाव तालुक्यात झालेल्या पाच दिवसांच्या पावसामुळे सोयगाव तालुक्यातील काही भागात कपाशी पिकांवर अचानक आकस्मिक मर चा प्रादुर्भाव आढळून आल्यावर पावसाने पूर्णपणे उसंत देताच अचानक कपाशी पिकांवरील कैऱ्यांना गळ लागल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात तब्बल चारही मंडळातील या प्रकारामुळे शेतकरी चिंतेत पडले आहे.सोयगाव तालुक्यात यंदाच्या प्रमुख पिके म्हणून कपाशीच्या पिकांची ३१ हजार ०८८ हेक्टरवर लागवड झालेली आहे.त्यावैकी ठिबक सिंचनवर तब्बल १८ हजार हेक्टरवर लागवड झालेली असुन कोरडवाहू क्षेत्रावर १३ हजार १५१ हेक्टर वर लागवड झालेली असून सोमवारी ठिबक सिंचन वरील आणि कोरडवाहू क्षेत्रातील कपाशी पिकांवर पाते आणि कैऱ्यांची गळ वाढल्याचा नवीन प्रकार उघडकीस आला आहे.आधीच आकस्मिक मरचा प्रादुर्भाव आढळून आलेला असतांना आणखी नवीन कैऱ्या गळचा प्रादुर्भाव झाल्याने सोयगाव तालुक्यातील ३१ हजार हेक्टरवरील कपाशीचे पिके संकटात सापडली असतांना तालुका कृषी विभागाकडून मात्र कोणत्याही उपाय योजना हाती घेण्यात आलेली नव्हत्या.याबाबत सोमवारी शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माहिती देण्यासाठी आले असता शेतकऱ्यांना कोणीही भेटले नव्हते त्यामुळे विनंती बदल्यांच्या कचाट्यात असलेली तालुका कृषी विभागाचे तालुक्यातील खरीप हंगामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे.


Back to top button