शालेय पोषण आहार प्रकरणी मुख्याध्यापकाची २४ तासातच चौकशी ; घोसला शाळेतील प्रकार ,चार तासांच्या चौकशीचं अहवालात कारवाईची प्रतीक्षा

सोयगाव,दि.२६ :ज्ञानेश्वर धोंडू पाटील― घोसला(ता.सोयगाव)येथील प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी बुधवारी भेट देवून पाहणी केली असता,शालेय पोषण आहार प्रकरणी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून पुष्पा काळे यांनी जिल्हा परिषदेला माहिती देताच २४ तासातच चौकशीचे चक्र फिरले असून गुरुवारी जिल्हा परिषदेचे शालेय पोषण आहाराचे लेखापाल भाऊसाहेब देशपांडे यांनी घोसला गाव गाठून मुख्याध्यापक विजयसिंग राजपूत यांची चार तास चौकशी केली.

घोसला ता.सोयगाव शाळेचे मुख्याध्यापक विजयसिंग राजपूत यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला बाधा होईल असे वर्तन केले असल्याचा ठपका ग्रामस्थांनी ठेवला असून नित्कृष्ट दर्जाचे शालेय पोषण आहाराचे धान्य वाटप करून यामध्ये वाटप करण्यात येणाऱ्या मीठ,गोडेतेल,जिरे आदी वस्तूंची मुदत संपल्यावरही वाटप केल्याचा खळबळजनक आरोप ग्रामाथांनी केला आहे.शालेय समितीची दोन वर्षापासून बैठकच घेतली नसल्त्यचा ठपका ठेवण्यात आला आहे.या सर्व आरोपांची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी तातडीने गुरुवारी श्जालेय पोषण आहाराचे लेखापाल भाऊसाहेब देशपांडे यांना पाठीविले होते.या चार तासांच्या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषदेला सुपूर्द झाल्यावर संबंधित मुख्याध्यापकावर काय कारवाई होते याची ग्रामस्थांना उत्कंठा लागून आहे.

Previous post सोयगाव तालुक्यात नुकसानीचा सडा ,पावसाच्या उघडिपीनंतर कपाशीच्या कैऱ्यांची गळ
Next post जिल्हा काँग्रेस कमेटीच्या बैठकीचे २७ ऑगस्ट रोजी बीड येथे आयोजन ,काँग्रेस पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे-जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे आवाहन