बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

सारीका सोनवणेंवरील कथील हल्ला राष्ट्रवादीचा बनाव - गोरक्ष रसाळ

बीड(प्रतिनिधी): केज तालुक्यातील धर्माळा येथे सारीका सोनवणे यांच्यावर हल्ला झाला असल्याची जी अफवा राष्ट्रवादीने पसरवली आहे, ते भाजप विरोधात कटकारस्तान असून ज्यांनी हल्ला केला तो गणेश कदम नावाचा राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता आहे. जातीयवाद पसरवण्यासाठी आणि मतदारांची दिशाभूल करून सहानुभूती मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने हा स्टंट केला असल्याचे गोरक्षदादा रसाळ यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी केज तालुक्यातील धर्माळा येथे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीची सभा सुरू असताना दुर 200 मिटरवर दारू पिऊन राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
यानंतर यातीलच एकाने सभेत घुसून गोंधळ घातला. याबाबत रितसर तक्रार धारूर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. फिर्यादीने सदरील प्रकार राजकीय कारणावरून झाला नसल्याचे म्हटले आहे. असे असतानाही जातीयवाद पसरवून सहानुभूती मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे लोक सारीका सोनवणे यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला असल्याची अफवा पसरवत आहेत.

या हल्ल्याशी भाजपच्या कार्यकर्त्यांचा कसलाही सबंध नाही. यामुळे मतदारांनी राष्ट्रवादीने पसरवलेल्या अफवेवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन ऊसतोड कामगारांचे नेते गोरक्षदादा रसाळ यांनी केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.