औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

घोसला येथे अतिव्रुष्टिने बाधीत शेती नुकसान झालेल्या शेतकरी यांची विचारपुस करत राज्य शासनाकडुन मदतीचा दिला धीर

रात्रीच्या अंधारातही माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची पाहणी

घोसला:ज्ञानेश्वर धोंडू पाटील दि.६: मागील आठवडाभरापासून सोगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यामध्ये घोसला ,निमखेडी ,उमर वीरा ,तिडका ,बनोटी ,वरठाण, आदी भागात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तातडीने रात्रीच्या अंधारात पाहणी केली यावेळी माजी खासदार खैरे नुकसानीची तीव्रता पाहून भावुक झाले होते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी अतिवृष्टीने बाधीत झालेले शेतकरी ज्ञानेश्वर विष्णू गवळी घोसला यांची चंद्रकांत खैरे यांनी धीर दिला.शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार असून सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीचा नुकसानीची सरसकट पंचनामे करून शंभर टक्के नुकसानीची मदत देण्याचे आश्वासन दिले

यावेळी आमदार उदय सिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख अवचित नाना आवळे तालुकाप्रमुख केतन काजे सोयगाव तालुका संघटक दिलीप भाऊ मचे सोयगाव शहराध्यक्ष गजानन पाटील कन्नड तालुका संघटक अण्णासाहेब शिंदे तसेच घोसला येथील सरपंच उपसरपंच सदस्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button