महाराष्ट्र राज्यराजकारण

भाजप नेत्यांच्या महाराष्ट्रात १ हजार सभा होणार

मुंबई :लोकसभा निवडणुक २०१९ साठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोरदार धडाका उडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सुमारे एक हजार जाहीर सभा तसेच रोड शो होणार आहेत, अशी माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा १ एप्रिल रोजी वर्धा येथे सकाळी होणार असून त्याशिवाय अन्य लोकसभा क्षेत्रातही भाजपा-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तारखेला कोल्हापूरात प्रचाराला सुरूवात केली असून त्यांच्याही ७५ पेक्षाही अधिक सभा या राज्यात होतील.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आगामी काळात महाराष्ट्रात प्रचाराला येणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील प्रचारसभामध्ये सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असूनही ते महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्याशिवाय चंद्रकांत दादा पाटील, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्याही सभा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणार आहेत.

    या नेत्यांशिवाय राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, सैय्यद शाहनवाज हुसेन, मुख्यात अब्बास नकवी, रमणसिंग, केशव प्रसाद मोर्य हे नेतेही राज्यातील भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत.या राष्ट्रीय नेत्यांसोबत राज्यातील अन्य नेत्यांच्या सभाही महाराष्ट्रात होणार आहेत. गिरीश महाजन, गिरीश बापट, अतुल भातखळकर, आशिष शेलार, माधव भांडारी, कांताताई नलावडे हे प्रचार सभा घेणार आहेत असे केशव उपाध्ये म्हणाले.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.