औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

कंकराळा ग्रामपंचायत मार्फत जेष्ठ नागरिक कक्ष स्थापन

सोयगाव दि. ०७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― तालुक्यातील मौजे कंकराळा येथे दि. ०५ मंगळवार रोजी सुनिल केंद्रेकर मा.आयुक्त औरंगाबाद यांच्या संकल्पनेतून ” थोडेसे मायबापासाठी ” या अभियानातुन कंकराळा ग्रामपंचायत मार्फत जेष्ठ नागरिकांसाठी कक्ष स्थापन करण्यात आले, कक्षाचे शुभारंभ पंचायत समिती सोयगाव येथिल गटविकास अधिकारी डी. एस. अहीरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी उपस्थित सरपंच सौ. चंदाताई शिवदास राजपुत, कृषी विस्तार अधिकारी सांळुके नाना, सांख्यिकी विस्तार अधिकारी के. एस. पाटील, स्थापत्य अभियंता सहाय्यक गजानण जोशी , अमोल सानप, केंद्र प्रमुख जी. आर. पाटील आदी प्रमुख पाहुणे उपस्थितीत होते, तसेच ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड, माजी सरपंच शिवदास राजपुत, मुख्याध्यापक एस.आर. खाकरे, महेश गवादे, युवा सेनेचे कुणाल भाऊ राजपुत, ग्रामरोजगार सेवक प्रताप उबाळे , सुनिल पाटील, प्रविण घुसिंगे, हिरालाल ढाकरे, अंगणवाडी सेविका बिंदलाल, मदतनीस बडकणे आदी कर्मचारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Back to top button