कडा:शेख सिराज―
आष्टी तालुक्यातील ऊंदरखेल येथील जागृत देवस्थान तुळजापूरचे उपस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोन्याआई मंदिरात गुरुवार दिनांक.7 ऑक्टोबर रोजी विधिवत पुजाअर्चा करून मोठ्या उत्साहात ऊंदरखेल ग्रामस्थ व देवीभक्तांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली.निसर्गरम्य वातावरणात असलेले देवीचे मंदिर हे पंचक्रोशीत प्रख्यात आहे. भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.भोन्याआईच महात्म्य प्रसिद्ध आहे.दरवर्षी ऊंदरखेल येथील तरुण श्री क्षेत्र तुळजापूर ते ऊंदरखेल हेअंतर पायी चालत देवीची ज्योत घेऊन येतात.मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी असुन सुध्दा तरुण पायी ज्योत आणली जात आहे. ही ज्योत ऊंदरखेल ते तुळजापूर पायी चालत घेऊन यायचे गेल्या सहा वर्षांपासूनची परंपरा कायम आहे.यामध्ये जवळपास दिडसे ते दोनशे तरुण सहभागी होतात.ऊंदरखेल आणि परिसरात भोन्याआई मातादेवीचे महात्म आहे.संपूर्ण पंचक्रोशीत ही देवी नवसाला पावते म्हणून तिची ख्याती आहे.ऊंदरखेल ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेभावाने नवरात्र महोत्सव साजरा करतात. नऊ दिवस विविध कार्यक्रमाने नवरात्री साजरी करण्यात येते.