घोसला:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगांव तालुक्यात घोसला येथे ग्रामसभेत सरपंच सुवर्णा ज्ञानेश्वर पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत नवीन तंटामुक्त अध्यक्ष ज्ञानेश्वर भिका गवळी व उपाध्यक्ष सचिन बाबुलाल ओगले यांचे बिनविरोध निवड करण्यात आली….
या निवडीच्या अनुषंगाने घोसला येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,सदस्य ,या सर्वांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले..
यावेळी निवडी दरम्यान तंन्टा मुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आम्ही घोसला गावातील शांतता व शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे अगदी काटेकोर पालनासाठी सर्व नागरिकांना समाज घालून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले…