सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― लोकसहभागातून सुरू असलेल्या आमखेडा उपकेंद्रातील मदर केअर सेंटर मधे ३३ गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आली
आज झालेल्या आरोग्य तपासणी शिबिराच्या कार्यक्रमात संजय शहापूरकर यांनी सांगितले कुपोषण कमी व्हावे यासाठी गरोदर माता सशक्त असणे गरजेचे आहे त्यामुळे या मदर केअर सेंटर मध्ये दर महिन्याला आरोग्य आरोग्य रक्त तपासणीनंतर गर्भवती महिलांना कॅल्शियम व लोह युक्त औषधी चे वाटप करण्यात येते या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांची नॉर्मल डिलिव्हरी होऊन सशक्त बाळ जन्माला आले आहेत.
यानंतर आरोग्य सेविका कल्पना डांगरे यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली तर ग्रामीण रुग्णालयाच्या पॅथॉलॉजी विभागाने रक्त तपासणी केली.
त्यानंतर या महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाला आशा सेविका सविता बडोदे दीपा नवगिरे संगीता चोथमल बेबीबाई सूर्यवंशी अंगणवाडी सेविका विद्याताई रोकडे मंगला ठाकरे सालुंकाबई बागले मनीषा मोहरे आरोग्य सेवक बनसोडे लॅब टेक्निशियन भागवत बेटकर डॉ सुनील वानखेडे पाटील
ज्योती बारी सुनीता वाघ ज्योती चंदेल यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.