बीड(प्रतिनिधी): बीड जिल्ह्य़ातील नागरीकांची विविध मागण्यां संदर्भात लोकशाही मार्गाने न्याय मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आदि ठीकाणी उपोषणकर्ते आंदोलन करत असताना त्यांना पावसाळ्यात, उन्हाळ्यात अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांना निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय आदि मुलभुत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागण्यांसाठी दि.11 ऑक्टोबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, शेख युनुस च-हाटकर, एस. एम.युसुफ पत्रकार,सय्यद ईलियास, पांडुरंग आंधळे, सुदाम कोळेकर,रामधन जमाले,संदिप जाधव ,सय्यद ईलियास,नितिन सोनावणे, सहभागी होते, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषणकर्ते आंदोलन करतात, सर्वसामान्य माणसाला टेंन्ट ऊभारणे आदिचा आर्थिक भार पेलवत नाही, तसेच 4 वर्षापुर्वी उपोषण करणा-या पारधी कुटुंबियांवर झाडाची फांदी कोसळल्याने 4 जण जखमी झाले होते, पावसाळ्यात उपोषणकर्त्यांना भिजावे लागते तर उन्हाळ्यात चक्कर येऊन आंदोलकांना दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळेच निवारा शेड सह पिण्याचे शुद्ध पाणी,शौचालय,तसेच बंदिस्त नालि आदि. मुलभुत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी करत आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
5 वर्षापासूनचा लढा, 5 वर्षापुर्वी जिल्हाधिका-यासमोरील नालीची साफसफाई करून आंदोलन केले होते – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
6 एप्रिल 2015 रोजी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली वरील मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडेझुडपे तोडुन, नालीची साफसफाई करून गांधिगिरी आंदोलन करण्यात आले होते, विविध दैनिकातुन बातम्या प्रसिद्ध होऊन या अनोख्या आंदोलनाचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात आले होते, त्यानंतर दि. 13 एप्रिल 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.
रोटरी क्लबने निवारा शेडसाठी पुढाकार घेतलाय ,जिल्हाधिका-यांची परवानगी आवश्यक – डाॅ.सुदाम तांदळे
उपोषणकर्ते यांच्या निवा-यासाठी शेड उपलब्ध करून देण्यात यावे यासाठि डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शेख युनुस च-हाटकर,के.के.वडमारे पांडुरंग आंधळे, सुदाम कोळेकर, पत्रकार एस. एम.युसुफ, आपचे रामधन जमाले, भाऊसाहेब फुंदे,दिनानाथ शेवालीकर आदिंनी लेखी निवेदन जिल्हाधिका-यांना दिले असून या संदर्भात रोटरी क्लबच्या पदाधिका-यांना निवारा शेडसाठी सहकार्य करण्याची लेखी निवेदनाद्वारे विनंती केल्यानंतर त्यांनी सहमती दर्शवित जिल्हाधिका-यांच्या परवानगीची आवश्यकता असल्याने त्यासाठी सोमवारी जिल्हाधिका-यांना प्रत्यक्ष भेटून परवानगी मागण्यात येणार आहे.