औरंगाबाद:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― उत्तर प्रदेश येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने चारचाकी वाहनाने शेतकऱ्यांवर केलेल्या हल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली
महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रमुख उपस्थितीत सोयगाव तालुक्यात महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास सर्व स्तरातून उदंड प्रतिसाद मिळाला.जवळपास 100 टक्के व्यापाऱ्यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ बंद पाळून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पाठिंबा दर्शविला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकरराव काळे, उपजिल्हा प्रमुख राजुभाऊ राठोड ,तालुका संघटक दिलीप मचे,जि. प. सदस्य गोपीचंद जाधव, शिवसेना शहरप्रमुख संतोष बोडखे, मा.शहरप्रमुख गजानन चौधरी, रमेश गव्हांडे, अक्षय काळे,आप्पा वाघ ,राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र काळे,प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष भैय्या जुनघरे, काँग्रेसचे राजेंद्र काळे, उस्मान पठाण,डॉ. फुसे, कृष्णा राऊत,जीवन पाटील, मोतीराम पंडीत, सोपान देवरे, अमोल मापारी, शरीफ शहा, भिका अप्पा, महाजन सर,विलास बोर्डे,संजय आगे, जावेद पिंजारी, राजू चौधरी, योगेश नागपुरे, भगवान वारंगणे, दिपक पगारे, दिनेश काळे,महेश चौधरी, संदीप चौधरी, शरीफ शाह, रशीद पठाण, रविंद्र बावस्कर, अज्जू भाई, हिरा चव्हाण, राहुल राठोड, कासम भाई, दत्तू इंगळे, पंजाब कूनघर, अरुण वाघ, श्रावण राठोड, प्रताप जाधव, श्रावण जाधव, समाधान काळे, शेख मुनाफ, राजेंद्र गव्हाड, ज्ञानेश्वर आस्वार, गजानन बडक, अनिल ठाकरे, शेख जाकीर, जितेश चणाल आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.