बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमीशेतीविषयक

लिंबागणेश करांनी संचिरबंदी शिथिल कालावधीत आठवडे बाजार भरवला―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.परंतु लिंबागणेशकरांनी शेतकरी यांचा शेतात पिक ,फळे; पालेभाज्या वाया जाऊ नये तसेच ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी संचारबंदी शिथिल कालावधी सकाळी ११:३० ते‌ दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार एकाच ठिकाणी गर्दी न करता १ मिटरच्या म्हणजेच सव्वा ३ फुट अंतर ठेवून पालेभाज्या , फळे विक्रेते आणि ग्राहकांनी समजुतदार पणा दाखवत बाजार भरवण्यात आला.

जमादार वाघमारे , ग्रामविस्तार अधिकारी तेलप , डॉ.गणेश ढवळे यांनी पुढाकार घेतला

ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना कष्टाने पिकवलेल्या भाजीपाला , फळं मातीमोल ठरू नये आणि ग्रामस्थांची बाजारहाट वाचुन गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार संचारबंदी शिथिल कालावधीत व्यापारी आणि ग्राहक यांना कोरोना विषाणुच्या संसर्ग होऊ नये यासाठी जनजागृती करत ३ फुट अंतर राखून रांगेत उभे राहून कायद्याच्या चौकटीत राहुन बाजार भरू दिला.यावेळी लिंबागणेश पोलिस चौकीचे जमादार वाघमारे आणि त्यांचे सहकारी , ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी तेलप आणि डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पुढाकार घेत दुपारी ३ वाजण्याच्या आत सर्व व्यापारी व ग्राहक यांनी संचारबंदी कालावधी सुरू होण्याच्या आधी संपुष्टात आणला.


Back to top button