सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शेतकऱ्यांना शेती संबंधी जोपर्यंत संपूर्ण कायदे समजणार नाही तोपर्यंत कायदेशीर लढा यशस्वी होणार नाही असे उद्गार किसान पुत्र आंदोलनाचे सदस्य ऍड भूषण पाटील यांनी केले.
अजिंठा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री स्वातंत्र्यसेनानी,कै. बाबुरावजी काळे यांच्या पुण्यतिथी निमित्त संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून एड. भूषण पाटील बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून माजी प्राचार्य नामदेवराव चापे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रंगनाथ (नाना)काळे होते. यावेळी संस्थेचे सचिव माननीय श्री प्रकाशदादा काळे, जिल्हा परिषद सदस्य सौ पुष्पाताई काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हरिशचंद्र लघाने, विजयेंद्र काबरा, विजय दौड, शांतीलाल अग्रवाल, डॉ.अशोक नाईकवाडे, प्राचार्य डॉ. मीना पाटील, डॉ.फुलचंद सलामपुरे, डॉ.राजेश यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना एड. पाटील म्हणाले आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात विविध आंदोलने होत आहेत परंतु आंदोलने नेमक्या कोणत्या कायद्यासंदर्भात होत आहेत याची माहितीच शेतकऱ्यांना नाही ही खंत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य नामदेवराव चापे यांनी कै. बाबुरावजी काळे यांचे राजकीय व सामाजिक कार्य विस्तृत केले. तसेच अध्यक्षीय समारोप करताना माननीय श्री रंगनाथ काळे म्हणाले आप्पासाहेब यांची सामाजिक बांधिलकी ही अखंड, अविरतपणे यापुढेही राहील असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार यांनी केले तर अजिंठा शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. अशोक नाईकवाडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सौ. पुष्पाताई काळे मा. श्री विजय दौड, मा. श्री शांतिलाल अग्रवाल यांनी कै. बाबुरावजी काळे यांच्या कार्य स्मृतीला उजाळा दिला. कार्यक्रमाच्या शेवटी मा. श्री रंगनाथ काळे यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भाऊसाहेब गाडेकर यांनी केले तर आभार डॉ. रावसाहेब बारोटे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.