सोयगाव,दि.२१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
निराधार,विधवा आणि श्रावण बाळ योजनेतील;पात्र लाभार्थी महिला आणि पुरुषांना शासनाच्या सहा पेन्शन योजनांचा लाभ मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नसून संबंधित गाव तलाठ्यांना आणि मंडळ अधिकाऱ्यांना पात्र महिलांना उत्पन्न प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केल्यास अधिकच मोर्चा तीव्र करेल असे विधान माजी हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात केले.
सोयगाव तहसील कार्यालयावर माजी हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली निराधार आणि विधवा,वृद्ध महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता.शिवाजी चौकातून निघालेल्या या मोर्चाला तालुक्यातून हजारो महिलांची उपस्थिती होती.यावेळी तहसील कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महिलांना शासनाच्या सहा पेन्शन योजनेचा लाभ मिळेपर्यंत स्वस्त बसणार नसल्याचे उद्गार काढले.मोर्चासाठी इशाताई झा,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिजाबाई जाधव यांनी महिलांचे नेतृत्व केले होते.
शासनातर्फे तहसीलदारांनी विलंब केल्याने ठिय्याचा निर्णय—
सोयगाव तहसील कार्यालयावर धडकलेल्या मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी तहसीलदारांनी विलंब केल्याने,संतापलेल्या माजी आमदार यांनी अखेरीस जिल्हाधिकारी येईपर्यंत उठणार नसल्याचा पवित्रा घेताच निम्मे तहसील कार्यालय मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी घटनास्थळी धडकले यावेळी तहसीलदार रमेश जसवंत यांनी सर्व महिलांच्या ऑनलाईन संचिका प्राप्त होताच दिवाळी पूर्वी त्यांना मंजुरी देवून या महिलांना शासनाच्या विविध सहा पेन्शन योजनांचा लाभ देण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.
-या मोर्चात ग्राम पंचायतीच्या सी.एस.सी कोड बाबतही महत्वपूर्ण मागणी करण्यात आली होती.ग्राम पंचायतींच्या सी,एस.सी ला अद्यापही कोड प्राप्त नसल्याने ग्रामीण महिलांच्या संचिका ऑनलाईन होत नसल्याचे या मागणीत नमूद करण्यात आले होते यावर आश्वासन देतांना तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले कि रविवारी जिलाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक होणार आहे त्यामुळे या बैठकीनंतर हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले.
-मोर्चासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिजाबाई जाधव,विजय नाना सोळून्खे,सावकार महाजन,ज्ञानेश्वर जाधव,दिगंबर जाधव,खेमराज जाधव,सागर जवरस,मुरलीधर पाटील,अमोल माने,प्रभाकर तायडे,पिंटू सोळुंके,युवराज जाधव,बापू धुमाळ,गणेश मगर,अन्नपूर्णाबाई तायडे,भिकूबाई खैरनार,सुशीलाबाई जाधव,आदिन महिलांची उपस्थिती होती