मलिकपुऱ्यातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी केला निर्धार
नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या नेतृत्वाखाली खाली मलिकपुऱ्यात भाजपा ची प्रचार फेरी संपन्न
परळी वैजनाथ, दि.३०: खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी शहराच्या भारतीय जनता पार्टी च्या वतीने नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या नेत्रत्वाखाली खाली मालिकपूरा भागात आज भव्य प्रचार फेरी काढण्यात आली,डॉ बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठात स्वतंत्र उर्दू विभाग,हज हाऊस च्या निर्मिती साठी व महाराष्ट्रातील उर्दू पुस्तक निर्मितीसाठी स्व गोपिनाथ मुंडे साहेबांनी मुस्लिमांना नेहमी चांगले सहकार्याचे काम केले असून मुस्लिम लोकांच्या न्याय हक्कासाठीं ना मुंडे साहेबां प्रमाणेच ना पंकजाताई मुंडे व डॉ प्रीतमताई मुंडे या सुद्धा सतत कार्यरत असतात,केंद्रातील भाजप सरकारने जनधन योजना,उज्वला गॅस योजना,गरिबांना घरे देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना,गरीबांना मोफत शौचालय आशा अनेक योजना दिल्या आहेत याचीच उतराई म्हणून आम्ही मालिकपूराच नाही तर शहरातील संपुर्ण मुस्लिम बहुल भागात डॉ प्रीतम मुंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊ असा निर्धार मलिकपुऱ्या तील मुस्लिम मतदारांनी केला. शहरात आपल्या घरचा उमेदवार अशी भावना डॉ प्रीतम मुंडे यांच्या बद्दल सर्व मतदारांच्या मनात निर्माण झाली आसुन चोहीकडे प्रितमताईंचीच लाट असल्याचा दावा या वेळी महायुतीच्या नेत्यांनी केला आहे.
या प्रसंगी नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांच्या समवेत भाजपा कार्यकर्ते वैजनाथ रेकने,भाजप सोशल मिडिया सेल चे विजयकुमार खोसे, मालिकपूरा विभाग प्रमुख अतिक फारुकी सर, फतरू भाई, शेख रफिक,शेख सद्दाम,हया खान, प्रकाश वावदाने लक्ष्मण कळसे यय्या शेख शेख रफिक वजीर खान शेख सद्दाम सय्यद मुन्ना शेख महंमद शेख युनूस शेख फैयाज शेख चांद मोहसीन खान ,शैख साबुद्दिन शेख फरीद याकुब खान जफर पठाण सय्यद आन्सर,बाबू चाटे,गणेश स्वामी,रोहित चामणार,साहील शेख, हया खान, सय्यद मुन्ना, वजीर खान, शेख फिरोज, शेख आबेद, युनूस शेख, शेख महेमुद, गणेश घोगरे, मोबीन खान, शेख चाँद, शेख नासर, शेख फरीद, प्रकाश वावदाने, मच्छिंद्र हारेल, लक्ष्मण कळसे, अनिल आव्हाड, दत्ता हारेल, वैजनाथ घोटकर, नवनाथ कस्तुरे, अभिषेक खोसे, साई तोरडमल आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.