सुरक्षा रक्षकांना दिपावली बोहणी (बोनस),भरपगारी सुट्या व भरपगारी रजा रक्कमेचे वाटप

Last Updated by संपादक

औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागा अंतर्गत औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे नोंदीत कार्यरत असलेल्या 571 सुरक्षा रक्षकांना अर्थिक वर्ष 2020-21 या कालावधीत मिळालेल्या वेतनावर 40.50 टक्के लेव्ही आकारली जाते. या लेव्ही रक्कमेमधून मंडळाकडे नोंदीमध्ये विविध शासकीय आस्थापना, शासकीय ग्रामीण रुग्णालय जालना, खाजगी आस्थापना आणि कारखाने अंतर्गत सुरक्षा रक्षकांना दिपावली बोहणी (बोनस), 8.33 टक्केवारी नूसार रक्कम रुपये 70,78,380/- भरपगारी सुट्टी 01 टक्केवारी नूसार रक्कम रुपये 8,49,526/- व भरपगारी रजा 03 टक्केवारी नूसार रक्कम रुपये 25,48,233/- अशी एकूण रक्कम रुपये 1,04,76,139 (अक्षरी एक कोटी चार लाख श्याहत्तर हजार एकशे एकोणचाळीस रुपये मात्र) सुरक्षा रक्षकांच्या व्यक्तीगत बँक खात्यावर जमा करण्यात येऊन, सर्व नोंदीत कार्यरत असण्याऱ्या सुरक्षा रक्षकांना दिपावलीच्या शुभेच्छा चं.अं. राऊत कामगार उपआयुक्त तथा अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, शाखा कार्यालय जालना, औरंगाबाद यांनी कळविले आहे.