क्राईमपरभणी जिल्हाब्रेकिंग न्युज

परभणी येथे रात्री हडको येथे शिवसेना नगरसेवक अमरदिप रोडे यांचा खून

कुऱ्हाडीने वार करत शिवसेना नगरसेवकाची हत्या

परभणीत नगरसेवकाची किरकोळ कारणावरुन हत्या

परभणी दि.३१ मार्च : परभणी मध्ये किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अमरदीप रोडे असे हत्या झालेल्या शिवसेना नगरसेवकाचे नाव आहे. परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेतील दोन आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

अमरदीप रोडे यांच्यावर किरकोळ वादातून त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी हल्ला केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रविवारी सकाळची ही घटना आहे. रवी गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावे आहेत.नगरसेवक रोडे यांची हत्या केल्यानंतर आरोपी रवी गायकवाड आणि किरण ढाके हे थेट पोलीस स्टेशनला हजर झाले. हत्येच नेमक कारण अद्याप समोर आलेल नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अमरदीप रोडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.