सोयगावला आचारसंहिता पथक कारवाईसाठी तैनात

सोयगाव दि.३०(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): लोकसभा निवडणुकांसाठी दोन मतदार संघांना जोडण्यात आलेल्या सोयगाव तालुक्यातील ८७ गावांसाठी सहा आचारसंहिता पथके तैनात करण्यात आले असून डोंगरदरयात जंगलमय रस्यावर या पथकांकडून संशयीत वाहनांची कसून चौकशी करण्यात येत असल्याने आचारसंहिता कारवाईसाठी पथके तैनात झाली आहे.शनिवारी सहायक निवडणूक अधिकारी प्रवीण पांडे यांनी भरारी पथकासोबत तालुका दौरा पूर्ण करून तपासणी अहवाल घेतला आहे.
औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदार संघांना जोडण्यात आलेल्या सोयगावला बैठे,भरारी आणि छायाचित्रण अशी सहा पथके कन्नड आणि सिल्लोड विधानसभा मतदार संघांना जोडणी करण्यात आलेल्या गावांना पाठविण्यात आले आहे.चोवीस तास ही सहा पथके तैनात तालुकाभर तैनात राहणार असून तीन शिफ्टमध्ये आचारसंहिता पथकातील कर्मचारी कामकाज करून अहवाल निवडणूक विभागाला देणार आहे.सहायक निवडणूक अधिकारी प्रवीण पांडे यांचं अधिपत्याखाली या पथकांची कामकाज सुरु असणार आहे.या तीनही पथकांची नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून नियंत्रण कक्षातून या पथकांना मार्गदर्शन माहिती पुरविण्यात येणार आहे.चार कर्मचारी असलेल्या या पथकात तब्बल आठ तास याप्रमाणे चोवीस आणि वाढीव सात अशी ३१ कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.