मुतखडा (किडनी स्टोन) झालाय ? मग हा उपाय करा

Last Updated by संपादक

आठवडा विशेष (हेल्थलाईन टीम)― तुम्हाला मुतखडा झाला असेल तसे निदान झाले असेल किंवा तुम्हाला पोटात कंबरेच्या वरच्या साईड ला दुखत असेल तर मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे कारण तुम्हाला मुतखडा असण्याची संभाव्यता आहे ?

कसा ओळखायचा मुतखड्याचा आजार ?

ह्या आजारात तुम्हाला पाठीमागे उजव्या किंवा डाव्या साईडला दुखेल ते दुखणं तुमच्या मूत्रपिंडा च्या साईडला देखील जाऊ शकतं.लगवी करताना जळजळ होऊ शकते. तर मग तुम्हाला या आजाराची संभाव्यता नाकारता येत नाही.त्याचसोबत कधी कधी लगवीतून रक्त देखील येऊ शकते त्यामुळे घाबरून न जाता आधी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते.

का होऊ शकतो मुतखडा ?

अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगायचे म्हणले तर तुम्हाला बऱ्याच दिवस पाणी कमी पिल्यामुळे किंवा तुम्हाला याआधी झालेला किडनी स्टोन यामुळे देखील पुन्हा मुतखडा (किडनी स्टोन) होण्याचा धोका असतो.तसेच उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनाही मुतखडा होऊ शकतो ? तसेच आहारात कॅल्शियम,सोडियम चे प्रमाण वाढले तर देखील मूतखडा होण्याचा धोका आहे. बोरवेल चे क्षारयुक्त पाणी पिणे इत्यादी टाळावे.ह्या आजाराचे निदान होण्यासाठी ह्या काही चाचण्या देखील मदत करतात -१. लगवीची तपासणी२.रक्ताची तपासणी३.सोनोग्राफी४. सिटी स्कॅन

काय आहेत मुतखडा झाल्यानंतरचे उपाय ?

महत्त्वाचा उपाय म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये.रोज सकाळी तुळसीची पाने खावीत त्यामुळे देखील खडा पडण्यास मदत होते.- मुतखड्याचा आकार मोठा असल्यास शस्त्रक्रिया मार्फत देखील खडा काढता येतो.- ESWL उपचार पद्धती