औरंगाबाद(ज्ञानेश्वर धोंडू पाटील,जिल्हा प्रतिनिधी)―जि. प. मराठी टाकरखेडा शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी घरोघरी जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना आज दिनांक ३/११/२०२१ रोजी पालकास पत्र दिले. या पत्रात दीपावलीच्या शुभेच्छा तसेच दिवाळीच्या कालखंडात कोरोनाचे नियमांचे पालन करणे आणि स्वच्छतेला प्राधान्य देवून ध्वनीमुक्त दिवाळी साजरी करणे तसेच फटाके उडवतांना लहान मुलांसोबत पालकांनी थांबले पाहिजे, त्यांना त्याचे संभाव्य अपघात, दुष्परिणाम समजावले पाहिजे आणि ध्वनिप्रदूषणास आळा बसण्यास सहाय्य केले पाहिजे आदी माहिती या पालकाच्या पत्रात दिलेली आहे.
पी.टी.पाटील यांनी पालकास पत्र हे प्रत्यक्ष पालकांपर्यत स्वतः पोहचवले.त्यांच्या समवेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर हे उपस्थित होते. पालकास पत्र पालकांना मिळाल्यावर पालक मनापासून पत्राचे वाचन करत होते आणि पी.टी.पाटील यांना धन्यवाद देत होते. काही पालकांनी बोलतांना सांगितले की, पहिल्यांदाच असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमातून नक्कीच शाळेची पटसंख्या वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांना शाळेची गोडी व पालकांना शिक्षकांविषयी आदर्श निश्चीतच निर्माण होणार असल्याचे पालकांच्या बोलण्यातून दिसून आले.
मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी पालकास पत्र वाटपाचा उद्देश सांगतांना सांगितले की, स्वच्छतेचे महत्त्व, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करणे, कोरोना कालखंडात नियमांचे पालन करणे, रोगराईमुक्त गाव करणे, पालकांना व पालकांना शाळेविषयी आवड निर्माण करणे तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालकांचे सहकार्य लाभणे हा त्यामागचा उद्देश आहे.
टाकरखेडा गावात पालकास पत्राची सर्वत्र चांगल्या शैक्षणिक उपक्रमाची चर्चा सुरू आहे.