मीडियातील गरजुवंतांची दिवाळी पत्रकार संघाच्या पुढाकारातून राजयोग आणि रोटरी क्लबने केली गोड

Last Updated by संपादक

आँफिस कर्मचारी आणि छपाई कामकारांना दिपावली साहित्य वाटप

बीड प्रतिनिधी:– प्रिंट मिडियातील पडद्यामागील खरे कष्टकरी कामगार वर्तपञाचा कणा असतात अश्या गरजवंतांना आणि वृत्तपञातील कार्यालयीन कर्मचारी आँफिस बॉय यांना राजयोग फाउंडेशन व रोटरी क्लब आँफ बीड मिडाटाऊन यांच्या वतीने पञकार संघाच्या पुढाकारातुन दिवाळी फराळ आणि दिवाळी साहित्य वाटप करण्यात आले.
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शुक्रवार दि.5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रिंट मिडियातील पेपर छपाई करणाऱ्या मशिनवरील आँपरेटर,कर्मचारी तसेच वृत्तपञांच्या कार्यालयात आँफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या 42 कर्मचाऱ्यांना जेष्ठ समाजसेवक दिलीप (भाऊ) धुत,रोटरीचे अध्यक्ष राजेश बंब, पञकार संघाचे अध्यक्ष वैभव स्वामी, सुर्यकांत महाजन, सुनिल पारख, डॉ.सुरेंद्र बजाज, नगरसेवक शुभम धुत, राजकुमार जैन,आत्माराम पवार आदि मान्यवरांच्या उपस्थितीत दिवाळी फराळ व साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष राजेश बंब म्हणाले एखाद्याने कितीही भारी रेमंड सारखा कपडा घेतला तरी शिवणाऱ्या कामगारावरच त्या कपड्याची उंची वाढते.त्याच धर्तीवर वर पञकारांनी कितीही चांगली बातमी आणली त्याचे गेटअप कितीही सुंदर असले तरी पेपरची कॉलिटी छपाईवरच अवलंबून असते.वृत्तपञांची उंची वाढण्याचे काम जो घटक करतो त्यांना सन्मानित करताना आनंद वाटत आहे.रोटरीचे चेअरमन सुर्यकांत महाजन म्हणाले वृत्तपञ व्यवसाय हा समाजाचा आरसा आहे त्याला उजाळा देण्याचे काम करणाऱ्या खऱ्या कामगारांना आज सन्मानित करण्यात आले आहे.
याप्रसंगी नगरसेवक शुभम धुत म्हणाले,मागील 5 वर्षापासून दिपावली फराळ आणि साहित्य गरजवंतांना वाटप करण्यात येत आहे पञकार संघाच्या माध्यमातून दरवर्षी मिडियातील विविध घटकांना दिपावली निमित्त सन्मानपूर्वक भेट देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम जो वर्ग करतो त्या मिडियाला सहकार्य करण्याची भूमिका राजयोग फाउंडेशन ने कायम जोपासलेली आहे.कार्यक्रमाचे प्रस्ताविक पञकार संघाचे मराठवाडा विभागिय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले.याप्रसंगी छपाई मशिन आणि कार्यालयीन कर्मचारी अश्या 42 जणांना दिवाळी साहित्य देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला.याप्रसंगी पञकार, डॉक्टर, वकिल,प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.