सोयगाव,दि.०६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
अतिवृष्टीची मदतीत राज्याच्या दहा हजार कोटी निधीतून सिल्लोड-सोयगाव तालुक्याला सर्वात प्रथम मदत मिळवून दिल्यानंतर आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रु मदत करून खरिपाच्या आलेल्या उत्पन्नातील अनुशेष भरून काढण्यासाठी रब्बी हंगामासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून बळकटी देण्याचा प्रयत्न शासन स्तरावर असल्याचे भाऊबीज भेट राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तिडका ता.सोयगाव येथे नारी सन्मान सोहळ्यात दिली आहे.त्यामुळे आता सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी जिल्हा बँक धावणार असल्याचे त्यांनी सांगितले .
मराठा प्रतिष्ठान आणि त्रिलोकनाथ गोयल चॅरिटेबल ट्रस्ट मालाड यांच्या संयुक्त विद्यमाने तिडका ता. सोयगाव येथे नारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपावली व भाऊबीज निमित्ताने संयोजकांच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते उपस्थित महिलांना साडी तसेच पुरुषांना शर्ट पॅन्ट चे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान पाटील, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, यांच्यासह तिडका चे सरपंच गुलजार तडवी, ज्ञानेश्वर युवरे,प्रमोद वाघ,विजय काळे, दिनेश जाधव, शेख मुबारक, ईश्वर सपकाळ, हरून पटेल, कृष्णा धुमाळ, दिलीप पाटील, संजय पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संजय पाटील,प्रभाकर काळे,राजू राठोड,मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान दादा गव्हांडे,आदींनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षस्थानावरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या वीज जोडणी वरही भाष्य करून रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वीज टंचाई भासू देणार नसल्याचे सांगून शेतकयांच्या वीज जोडणी वर महावितरणच्या हातोड्यावर मार्ग काढणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार,उपजिल्हाप्रमुख राजू राठोड,सोपान दादा गव्हांडे,संजय पाटील,जिल्हाध्यक्ष विजय काळे,प्रमोद वाघ यांच्या हस्ते ५ हजार महिलांना भाऊबीजसाठी साड्यांचे आणि पुरुषांना ड्रेस वितरण करण्यात आले.
पाच हजार महिलांची भाऊबीज मराठा प्रतिष्ठानहा स्तुत्य उपक्रम-
सोयगाव तालुक्यात भाऊबीज साठी पाच हजार महिलांना साड्यांचे वितरण करून मराठा प्रतिष्ठानने सोयगाव तालुक्यात आदर्शवत कार्य केले असून समाजाभिमुक कार्यासाठी वाहून गेलो असल्याची भूमिका सोपान गव्हांडे यांनी यावेळी यक्त केली आहे.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही सोयगाव तालुक्यातील तिडका आणि घोसला या दोन्ही गावात भाऊबीज साजरी करून या गावांमध्ये असलेल्या अडचणी दूर करण्यावर लक्ष केंद्रित करून सोयगाव तालुक्यात राज्याच्या मंत्र्यांनी भाऊबीज साजरी केल्याची चर्चा राज्यभर सुरु होती.रात्री सायंकाळी उशिरापर्यंत सोयगाव तालुक्यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव तालुक्यात महिलाच्या भेटीगाठी घेत त्यांच्या अडचणी समजून घेत भाऊबीज साजरी केली.
यावेळी कार्यक्रमासाठी मराठा प्रतिष्ठानचे गणेश गवळी,प्रमोद वाघ,ज्ञानेर्श्वर वाघ,तालुकाध्यक्ष विजय चौधरी,समाधान जाधव,कृष्णा धुमाळ,आबा उगले,निवृत्ती सागरे,आबा कोळी,उपसरपंच सुभाष बावस्कर,गुणवंत पाटील,बाळू बावस्कर,सोमू तडवी,संजय बावस्कर,ज्ञानेश्वर गवळी ,आदींनी पुढाकार घेतला होता.