जळगाव जिल्हाजामनेर तालुकामहाराष्ट्र राज्य

टाकरखेडा जि.प मराठी शाळेत बालदिन उत्साहात साजरा

जामनेर:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― टाकरखेडा ता जामनेर जि जळगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती तथा बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता तिसरीतील विद्यार्थी देवेंद्र रविंद्र सुरळकर हा होता. त्याच्या हस्ते तसेच उपस्थितांच्या हस्ते पंडीत नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी १४ विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तसेच शिक्षक देवाजी पाटील, श्रीमती ज्योती उंबरकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर, मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी निकीता साळुंखे यांनी केले व आभार मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी मानले व त्यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक रविंद्र चौधरी, श्रीमती छाया पारधे यांनी परिश्रम घेतले.

Back to top button