सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू युवरे (पाटील)―
अज्ञात चोरट्यांनी दावणीला बांधलेली घरासमोरील गाय रविवारी मध्यरात्री चोरीच्या प्रयत्नात चाहूल लागलेल्या कुटुंबियांनी गाय चोरांना हुसकाविण्याचा प्रयत्न केला असता अज्ञात चोरट्यांनी या कुटुंबातील सदस्यांना घेराव घालून गायीला वाहनात टाकण्याचा प्रयत्न केला.हि घटना घोसला ता.सोयगाव येथे रविवारी मध्यरात्री घडली परंतु घरातील कुटुंब जागेवर नसल्याचे पाहून १९ वर्षीय तरुणी जागी झाली असतांना अज्ञात चोरट्यांच्या घेरावात अडकलेल्या कुटुंबातील सदस्यांना पाहून या तरुणीने लाठ्याकाठ्या घेवून अज्ञात चोरांकडे धाव घेवून गायींसह कुटुंबियांची चोरट्यांच्या तावडीतून सुटका केली आहे.
घोसला ता.सोयगाव येथे गावालगत असलेल्या ज्ञानेश्वर गव्हांडे यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी गायीला दावण तोडून चोरण्याच्या प्रयत्नात वाहनात टाकत असतांना अचानक गायीच्या घुंगराचा आवाज होताच ज्ञानेश्वर गव्हांडे यांचेसह त्यांची पत्नी यांना चाहूल लागताच त्यांनी घरासमोरील रस्त्यावर धाव घेतली परंतु अज्ञात चोरट्यांनी या सदस्यांना घेराव घालून शस्राचा धाक दाखवून धमकाविले त्यामुळे चोरट्यांनी वाहनात गाय टाकतांना या कुटुंबातील दोन्ही सदस्यांना घेराव घातला परंतु घरातील सदस्य जागेवर झोपलेले नसल्याचे पाहून १९ वर्षीय तरुणी मयुरी गव्हांडे हिने घराबाहेर डोकावले असतांना गायीसह कुटुंबियांना चोरट्यांच्या नजर कैदेत पाहून मयुरी ने धाडस करून लाठ्याकाठ्यासह अज्ञात चोरट्यांवर तुटून पडल्याने अज्ञात चोरट्यांनी गायीसह कुटुंबियांना सोडून वाहन घेवून फरारी झाले त्यामुळे १९ वर्षीय तरुणीने चोरट्यांच्या तावडीतून गायीची व कुटुंबियांची सुटका केली आहे.पहाटे हा प्रकार परिसरात समजताच घबराट पसरली होती.
सोयगाव तालुक्यात जनावरे चोरींचा सुळसुळाट…पोलिसांची गस्त नसल्याने हा प्रकार-
सोयगाव तालुक्यात रात्रीची जनावरे चोरींचा मोठा उच्छाद सुरु झालेला असून सोयगाव पोलिसांकडून रात्रीची थातूर मातुर रात्रीची गस्त सुरु असल्याने अज्ञात चोरट्यांनी पोलिसांच्या गस्तीवर पाळत ठेवून जनावरे चोरीचा सपाटा सुरु केलेला आहे ,पोलिसांकडून सोयगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची थातूर मातुर गस्त सुरु केलेली आहे.रात्रीची गस्ती ऐवजी पोलिसांच्या वाहनांकडून रात्रीच्या आर्थिक व्यवहारात वाढ झाल्याचा आरोप पशुपाल्कांनी केला आहे.त्यामुळे रात्रीच्या चोरट्यांची हिम्मत बळावत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.