औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युज

फळबागा उत्पादक शेतकऱ्यांना कोरडवाहूच्या नुकसानीचे अनुदान, संतप्त शेतकऱ्यांचे सोयगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― प्रत्यक्षात फळबागा लागवड असतांना कोरडवाहूच्या नुकसानीचा निकष धरून सोयगावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीत चक्क फळबागाच्या अतिवृष्टीच्या नुकसानीतून वगळून कोरडवाहूचा निकष लावून नुकसानीची भरपाई दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्याने संतप्त ३० ते ३५ शेतकऱ्यांनी मंगळवारी महसूल आणि कृषीच्या विरुद्ध निदर्शने करून आमरण उपोषण सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार सोयगावात उघडकीस आला आहे.

सोयगाव शिवारात फळबागा लागवड निरंक असल्याचा चक्क तालुका कृषी विभागाने यापूर्वीच अहवाल दिल्याने अतिव्वृष्टीच्या नुकसानीत सोयगाव शिवारात फळबागाचे नुकसान होवून महसूल आणि कृषीचं पथकांनी कोरडवाहूच्या अहवाल दिला आहे.त्यामुळे अतिवृष्टीच्या फळबागा लागवड धारक शेतकरी फळबागांच्या अनुदानापासून वंचित राहिले आहे.त्यामुळे मंगळवारी सोयगावातील ३० ते ३५ शेतकऱ्यांनी सोयगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले.दत्तात्रय ढगे,तुळशीराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आमरण उपोषण सुरु करण्यात आले असून निवेदनात नमूद केले आहे कि सोयगाव शिवारात फळबागा लागवडीचा अहवाल निरंक दिल्याने अतिवृष्टीच्या फळबागाचं अनुदानातून वगळून प्रशासनाने कोरडवाहूचं निकषात गृहीत धरून अनुदानाची रक्कम खात्यावर वर्ग केली आहेत्यासोबतच शहरातील सोयगाव मंडळाच्या स्वयंचलित हवामान यांत्राबाबत संशय असल्याने या यंत्राचीही महिर्ती उपलब्ध करून द्यावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी सोयगावातील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

उपोषण स्थळी राजकीय नेत्यांच्या भेटी—-

मंगळवारी पहिल्याच दिवशी राजकीय नेत्यांनी उपोषण कर्त्यांना भेटी दिल्या आहे.भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस,प्रहार,आदी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहे.

प्रहार संघटनेचा शेतकऱ्यांना पाठींबा—-

प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने कृष्णा पाटील,संदीप इंगळे यांनी या आमरण उपोषणाला पाठींबा दिल्याचे लेखी पत्र दिले असून चुकीचा निकष लावणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना प्रहार स्टायलने धडा शिकविणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

सक्षम अधिकाऱ्याअभावी उपोषण कायम—-

ऐन आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी कृषी आणि महसूल विभागाचा एकही सक्षम अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने उपोषण कर्त्यांना ठोस आश्वासन देण्यासाठी सक्षम अधिकाऱ्या अभावी उपोषण कायम राहिले असून कृषी आणि महसूलचं प्रभारी अधिकाऱ्यांनी आश्वासन देण्याचे टाळल्याने उपोषणाचा मुक्काम वाढला होता.

उपोषणासाठी दत्तात्रय ढगे, तुळशीराम चौधरी, विनोद सोहणी, सुनिल काळे, सुनिल रोकडे, शांताराम तेंलग्रे, चंद्रास रोकडे, अनिल सोहणी, बाबुराव सोनवणे, भगवान गाडेकर, हर्षल रोकडे, सुखदेव रोकडे,आदींसह शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहे.

Back to top button