संभाजीनगर (ता.26) : आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक नंदू चौतमल यांच्यावतीने संजयनगर मुकुंदवाडी येथील रागिणी विजयकुमार दाभाडे हिस उपचारासाठी 25 हजाराचा चेक आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात देण्यात आला
संजयनगर मुकुंदवाडी येथील रागिणी विजयकुमार दाभाडे हिच्या उपचारासाठी आर्थिक निधी जमा करण्यात येत आहे, तिला अप्लास्टिक एरनिमिया हा दुर्मिळ आजार झाला असून सध्या तिच्यावर कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे, तिला या उपचारासाठी 10,00000/-इतका खर्च लागणार आहे घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाला हा उपचार करणे शक्य नाही, त्यामुळे समाजसेवक नंदू चौतमल आर्थिक मदत करण्याचे ठरवले होते, ही मदत केल्यामुळे दाभाडे कुटुंबाने आमदार संजय शिरसाट व समाजसेवक नंदू चौतमल यांचे आभार मानले.