कडा:शेख सिराज,आष्टी प्रतिनिधी― आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील शेतकरी बांधवांची लाईट त्वरित चालू करावी व प्रति कनेक्शन तीन हजार रूपये वसुली करावी या मुख्य मागणीसाठी सुलेमान देवळा गावातील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके, राम बोडखे आणि ज्ञानेश्वर चौधरी यांनी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक साडेआकरा वाजता उपअभियंता कार्यालय आष्टी यांच्या कार्यालयातील गेटचे पुष्पहार घालून श्रीफळ फोडून पूजन करून आंदोलन सुरू केले . यावेळी राम बोडखे सर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या व ज्ञानेश्वर चौधरी यांनी विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परमेश्वर घोडके यांनी शेतच कुंपण खात आहे असा सवाल करत आष्टी तालुक्यातील नेते विद्युत वितरण कंपनीला नमवण्यास कमी पडत असल्याची खंत व्यक्त केली . सुलेमान देवळा सह सराटे वडगाव ,आंबेवाडी भजनी मंडळ यांनी हरिजागर करत करत आणि परमेश्वर घोडके हे लोटांगण घेत विद्युत कार्यालय आष्टी ते तहसीलदार कार्यालय आष्टीच्या दिशेने शेकडो शेतकऱ्यांसह टाळ मृदुंग वीणा वाजवत निघाले . हे आंदोलन चालु असताना तहसीलदार साहेब यांचेकडून दक्षता घेत हे आंदोलन लवकरच थांबवण्यात आले . विद्युत अधिकारी व वरिष्ठ अधिकारींसोबत चर्चा करून तुमच्या आंदोलनाचं लेखी पत्र वरिष्ठ अधिकारी यांना पाठवुन तुमचा विज प्रश्न सोडवण्यास मदत करू असे आश्वासन तहसिलदार यांनी दिले . आष्टी पोलिस स्टेशनचे कर्मचारी आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये म्हणून हजर होते .
यावेळी राम बोडखे सर , ज्ञानेश्वर चौधरी ,कासमभाई शेख, सचिन आमले , शंकर घोडके तसेच इतर गावचे सरपंच आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील आंदोलन हे येत्या दोन दिवसात धानोरा येथील विद्युत वितरण कंपनीच्या गेटवर जागरण गोंधळ स्वरूपाचे करणार असुन हे आंदोलन आम्ही बंद करणार नाही असाच आक्रमक पवित्रा आम्ही घेणार आहोत.