बीड जिल्हा

बीड तालुक्यातील खुंड्रस, आडगाव, कुक्कडगाव, ब-हाणपुर, उमरी आदि गावातील सिंदफणा नदीपात्रातील अवैध वाळुतस्करी प्रकरणात महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांवर गुन्हे दाखल करा,प्रधान सचिव, विभागीय आयुक्तांना तक्रार – डाॅ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―
बीड तालुक्यातील खुंड्रस, आडगाव, कुक्कडगाव,चव्हाणवाडी, ब-हाणपुर, उमरी, रंजेगाव, नाथापुर, गावातील सिंदफणा नदीपात्रातील वाळु माफिंयासोबत संगनमताने शासनाचा महसुल बुडवून आर्थिक फसवणूक केल्याबद्दल संबधित उपविभागीय आधिकारी, तहसिलदार, मंडळ आधिकारी, तलाठी आणि पोलीस प्रशासनातील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, बीड अंमलदार यांच्यावर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
बीड तालुक्यातील मौजे खुंड्रस, आडगाव, कुक्कडगाव, चव्हाणवाडी, ब-हाणपुर, उमरी, रंजेगाव, नाथापुर आदि. गावातील सिंदफणा नदीपात्रातील वाळु वाळुमाफिया महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांच्या संगनमतानेच तस्करी करण्यात येत असून याविषयी दि.२८ जुन रोजी लेखी तक्रार केल्यानंतर दि.२९ जुन रोजी प्र.जिल्हा खनिकर्म आधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी उपविभागीय आधिकारी बीड यांना वरील प्रकरणात चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचे आदेश देऊन सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात येत नाही त्यामुळेच संबधित उपविभागीय आधिकारी, महसुल प्रशासनातील तहसिलदार, मंडळ आधिकारी, तलाठी आणि पोलीस प्रशासनातील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच बीट अंमलदार यांच्यावर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी कारण शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडवून आर्थिक फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

Back to top button