भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावे आखावे ,जिल्हाध्यक्ष कैलास पाटील चिकटगावकर यांचे कार्यकर्त्यांना आदेश

Last Updated by संपादक

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―

सोयगाव नगरपंचायतीच्या दरवाजे भाजपासाठी बंद करून भाजपाला रोखण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद पुरेशी आहे त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या भरोशावर विसंबून न राहता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पेटून उठा असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्ह्ध्यक्ष कैलास पाटील चिकटगावकर यांनी सोमवारी सोयगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत केले.

सोयगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोयगावला कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आघाडीचे संकेत मजबूत झालेले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने सर्वच्या सर्व जागांसाठी तयार राहावे असेही कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ्नेते रंगनाथ काळे,ठगन भागवत,तालुकाध्यक्ष डॉ,इंद्रजीत सोळून्खे,कॉंग्रेसचे जेष्ठ्नेते राजेंद्र काळे,अविनाश पाटील,रवी काळे,आदींची उपस्थिती होती.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोयगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व्हावी असा सूर काढला असतांना जिल्ह्ध्यक्ष कैलास पाटील चिकटगावकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद आजमावा असे आवाहन कार्यकर्त्यांना करून महाविकास आघाडीच्या भरोशावर न राहता पक्षाच्या ताकदीवर नगर पंचायत निवडणुका लढविण्याचे संकेत दिले आहे.भाजपा ला कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकवटून कामाला लागावे आणि शिवसेना महाविकास आघाडीसाठी सहजासहजी मान्य करणार नसल्याचे सुतोवाच त्यांनी दिले आहे.त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात सोयगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी आघाडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून कार्यकर्त्यांना बळ देण्यात जिल्हा पातळीवरून वरिष्ठांकडून मदत मिळत नसल्याची खंत जेष्ठ्नेते राजू अहिरे यांनी व्यक्त केली असून शहरध्यक्ष रवी काळे,तालुकाध्यक्ष इंद्रजीत सोळून्खे,ठगनराव भागवत आदींनी मनोगत व्यक्त केले.पक्षाचे जेष्ठनेते रंगनाथ काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

महाविकास आघाडीचा विचार डोक्यातून काढा

सोयगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा विचार आधी डोक्यातून काढावा लागेल तरच नगर पंचायत निवडणुकीत पक्षाला यश मिळेल असे जिल्ह्ध्यक्ष कैलास पाटील यांनी ठणकावून सांगितले जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा नेता कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.बैठकीसाठी युवकचे शहरध्यक्ष प्रमोद पाटील,सरपंच राजू पाटील ,नंदूबापू सोळून्खे,अनिस तडवी,ईश्वर चौधरी,दीपक देशमुख,महिला शहरध्यक्ष कमलबाई पगारे,पारस राठोड आदींची उपस्थिती होती आभार दीपक देशमुख यांनी मानले.