कडा/प्रतिनिधी(शेख सिराज)―
वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शेतीतील पिकांवर विविध रोगांचा फार दूर भाऊ होऊ लागल्याने परिसरातील शेतकरी चिंतातुर झाला आहे शेतीतील पीक वाचवण्यासाठी औषधांची फवारणी करीत पिके वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत
ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर धुक्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे.त्यामुळे महागड्या औषधांची फवारण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्हा ढगाळ व धुक्याचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.यंदा मजुरांच्या तुटवडा व वाढती रोजंदारी यामुळे कांदा लागवडीसाठी शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या महागाईत भरमसाठ वाढ झाली असल्याने रासायनिक खते, कीडनाशके, शेती औषधांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यात हवामानबदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहेत.
लाल कांदा लागवड झालेली असून, अपेक्षित त्या प्रमाणात यंदा कांदा पीक जगविण्यासाठी मोठ्या प्रमाणात महागडी औषधांची फवारणी करताना शेतकरी दिसत आहे.हवामानबदलाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. सध्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले शेतकऱ्यांचा कीटकनाशके, बुरशीनाशक फवारणीवर अधिकचा खर्च होत आहे.कांद्याला कसा भाव मिळतो हे माहिती नसले तरी सध्या शेतकरी आशावादी राहून आपल्या शेतात राबराब कष्ट करताना दिसत आहे. उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न यात ताळमेळ बसेल की नाही याचीही शाश्वती नसते. तरीही शेतकरी आपल्या कुटुंबाची जबाबदारी संपूर्णपणे शेतीवरच पार पाडत असतो.शेतीत लागणारी रासायनिक खते, मंजुरी, फवारणी असा एक एकरासाठी पन्नास हजारांचा खर्च होणार आहे. आज ना उद्या भाव मिळेल या अपेक्षेने पीक जगविण्यासाठी शेतकरी धडपड करीत असल्याचे चित्र दिसत आहे.