बीड:प्रतिनिधी― गेली दीड ते दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे बंद असलेल्या शाळा शासन आदेशानुसार नियमित सुरू झाल्या.कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू झाल्यानंतर एकाच वेळी आनंद आणि काळजी अशा दोन्ही भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसून येत असून,कोरोना महामारी विषयी शिक्षक व पालकांनी सर्तकता बाळगुन नियमाचे काटेकोर पालन करून शिक्षकांनी अध्यापन करावे असे आवाहन क्रीडा शिक्षक राहुल आर.मोरे यांनी केले आहे.
कोरोना महामारीच्या संसर्गाच्या भीतीने मागील दिड ते दोन वर्षापासून बंद असलेल्या शाळा पुन्हा १ डिसेंबर पासून शासनाच्या आदेशानुसार मोठ्या उत्साहात सुरू झाल्या.कोरोनासंदर्भात सर्व उपययोजना करत शाळेची घंटा वाजली असून विद्यार्थी,शिक्षक, पालक शाळेविषयी उत्साही आहेत.विद्यार्थीच्या किलबिलाटाने शाळा परिसर पुन्हा एकदा गजबजून गेला असून कोरोनाविषयी सर्वांनी सतर्कता बाळगणे आवश्यक असून पालकांनी मुलांना डब्बा,पुस्तके या शैक्षणिक साहित्याबरोबरच सेनिटायझर,मास्क विशेष काळजी घेत मुलांना द्यावे,त्याचबरोबर त्यांना सकस आहार,पौष्टिक पदार्थ भरपूर प्रमाणात घ्यावेत.विद्यार्थ्यांनी घरातून निघल्यापासून शाळेत व तेथून घरापर्यंत योग्य प्रकारे मास्क चा वापर करावा,वेळोवेळी हात स्वच्छ करत, नियम पाळावेत,सुरक्षित अंतर, तापमान नोंद ठेवावे.हवामान बदला नुसार पालक, शिक्षकांनी सतर्क राहून मुलांना सर्दी, डोकेदुखी,ताप आदी संसर्ग दिसल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत उपचार घ्यावेत,आवश्यक त्या सर्व दक्षता वेळोवेळी घ्याव्यात असे ही आवाहन त्यांनी केले आहे