सोयगाव,दि.०५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा मोठा गाजावाजा केला परंतु पहिल्या टप्प्यात केवळ नुकसानीच्या रक्कमेतून ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली असून उर्वरित २५ टक्के रक्कमेचा शासनाला निवडणुकांच्या धामधुमीत विसर पडला आहे.त्यामुळे हातावर आलेल्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातील पॉट निवडणुकांचा फटका बसला असून आता २५ टक्के नुकसानीच्या निधीची प्रतीक्षा लागून आहे.
अतिवृष्टीच्या नुकसानीत सोयगाव तालुक्याला ७५ टक्के निधीप्रमाणे ३० हजार ७३० बाधित शेतकऱ्यांसाठी २४ कोटी ,८० लक्ष ३६२८० इतकी रक्कम सोयगाव तालुक्याला प्राप्त झाली होती यामध्ये २७ हजार ३४ शेतकऱ्यांच्या खात्यावर २२ कोटी अकरा लक्ष ३५ हजार ७४० इतकी रक्कम वितरीत करण्यात आली परंतु तलाठ्यांनी पहिल्या टप्प्यातील निधीलाही बाधित शेर्ताकार्यांच्या याद्याच पुरविल्या नसल्याने २ कोटी ५० हजार इतका निधी धूळखात पडून असून मात्र शासनाला उर्वरित २५ टक्के अतिवृष्टीच्या रक्कमेचा विसर पडलेला असून तालुका प्रशासनाकडून २५ टक्के रक्कमेपोटी जिल्हाधिकारी कार्यालयाला ८ कोटी ३७ लक्ष निधीच्झी मागणी करूनही २५ टक्के रक्कमेच्या निधीचा अद्याप पुरवठा झालेला नसल्याने जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका आणि नगरपंचायत निवडणुकामुळे शासनाला निधीचा विसर पडल्याचे चित्र आहे.
पहिल्या टप्प्यातील बाधित शेतकऱ्यांच्या तलाठ्यांनी अद्यापही काही शेतकऱ्यांच्या याद्याच पुरविलेल्या नसल्याने पहिल्या टप्प्यातील निधीतून तब्बल २ कोटी ५० हजार इतकी अतिवृष्टीची रक्कम वितारणाअभावी रखडलेली असून तलाठ्यांना सोमवारी अंतिम डेडलाईन तहसील कार्यालयाने दिलेली आहेमात्र अद्यापही २५ टक्के उर्वरित रक्कमेचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरवठा झालेला नसल्याने २५ टक्के अतिवृष्टीच्या रक्कमेचा शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सोयगाव शहरात नगरपंचायतीची निवडणूक होवू घातल्याने सोयगाव शहरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या निधीच्या २५ टक्के रक्कम वितरणाला आचारसंहितेचा फटका बसणार असून सोयगाव शहर वगळता तालुक्यात इतरत्र मात्र निधी मिळाल्यावर निधीची वितरण हाती घेता येईल सोयगाव शहरात आचारसंहिता असल्याने शहरातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याच्या निधीसाठी जानेवारीची वाट पहावी लागणार असल्याची माहिती हाती आली आहे.