तलावात उडी मारून कर्जबाजारी शेतकर्याची आत्महत्या ,घोसला येथील घटना

Last Updated by संपादक

सोयगाव,दि.०७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कर्जाचा डोक्यावरील डोंगर आणि त्यातच रब्बीच्या पेरणी साठी हातात रक्कम नसल्याने वैतागलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने थेट शेताजवळील तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी घोसला ता.सोयगाव येथे घडली याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून महसूल विभागानेही पंचनामा केला आहे.या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

युवराज कडू बावस्कर (वय ५८) असे तलावात उडी घेवून आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे.या शेतकऱ्याकडे घोसला शिवारात चार एकर शेती आहे,खरीपात त्यांनी कपाशीची लागवड केली होती मात्र अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे आणि त्यातच कपाशीच्या विम्याची रक्कम मंजूर होत नसल्याने या वैतागलेल्या शेतकऱ्याने शेताजवळील एका तलावात दुपारी उडी घेवून आत्महत्या केली आहे,या अल्पभूधारक शेताकात्याचा मृतदेह रस्त्याने येणाऱ्या जाणार्या शेतकऱ्यांना आढळून येताच त्यांनी घटनेची माहिती सोयगाव पोलिसांना दिली त्यावरून सोयगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले.युवराज कडू बावस्कर यांचेकडे थोध्शीच शेती होती खरिपाच्या हंगामाने दगा दिल्यावर त्यांनी रब्बीसाठी शेतीची पूर्वतयारी केली परंतु रब्बीच्या पेरण्या साठी त्यांचेकडे पैसाच नसल्याने आणि बँकेच्या कर्जाच्या बोजा फेडण्याच्या विवंचनेत त्यांनी शेताला लागून असलेल्या तलावात उडी घेवून आत्महत्या केली आहे.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,महसूल विबाह्गाच्या वतीने तहसीलदार रमेश जसवंत यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा केला आहे.या शेतकऱ्याकडे बँकेचे दोन लक्ष पन्नास हजार आणि खासगी ती लक्ष असे पाच लक्ष पन्नास हजार कर्ज होते त्यामुळे वैतागून त्यांनी अखेरीस तलावात उडी घेवून आत्महत्या केली असल्याचे प्रशासनाच्या पंचनाम्यावरून निष्पन्न झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली,एक मुलगा,असा परिवार आहे.सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यावर त्यांचेवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.