जामनेर:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जामनेर तालुक्यातील टाकरखेडा जि.प मराठी शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील तसेच पालक आत्माराम सुरळकर हे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक पी.टी.पाटील, उपशिक्षक देवाजी पाटील, जयंत शेळके, श्रीमती छाया पारधे, श्रीमती ज्योती उंबरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेत सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत इ.चौथी – २१, इ. पाचवी – ३०,इ.सहावी – २१, इ. सातवी – १६ अश्या एकूण ८८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे इयत्ता चौथी:- १) गणेश समाधान कोळी (प्रथम) २)नव्या राजेश सुरळकर(द्वितीय)
३)मोहिनी अमृत दांडगे (द्वितीय)
४)पवन भागवत भील (तृतीय)
पाचवी:- १)सृष्टी बाळु पाटील (प्रथम)
२)भावेश ज्ञानेश्वर पडोळ (प्रथम)
३)प्राची राजेंद्र पाटील (द्वितीय)
४) तुषार युवराज गावंडे (द्वितीय)
सहावी:-१) नैतीक संतोष भोई (प्रथम)
२)प्रतिज्ञा समाधान लोहार (द्वितीय)
३)ऋषीकेश एकनाथ सुरळकर ((द्वितीय)
४)जया सुभाष भोई (तृतीय)
सातवी:-१) सपना विनोद भोई (प्रथम)
२)वैभव संजय सुरळकर (द्वितीय)
३)मानसी आत्माराम सुरळकर (तृतीय)
४) रुचिका शिवाजी केणे (तृतीय)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत शेळके यांनी केले व आभार रविंद्र चौधरी यांनी मानले.