आष्टी/प्रतिनिधी(शेख सिराज): दि.6 रोजीआष्टी तालुक्यात अवकाळी व गारव्यामुळे झालेल्या शेती पिकाचे पंचनामे महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ करण्यात यावी. तालुक्यात प्रामुख्याने कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते सध्या अवकाळी पाऊस ,गारा आणि धुके या दूषित वातावरणामुळे सर्व शेती मालाचे नुकसान झाले आहे. तरी आपण तात्काळ महसूल विभाग कृषी विभाग यांना प्रत्यक्षात शेतात पाहणी करून शेती पिकाचे तात्काळ पंचनामे करावेत. या सततच्या निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हवालदिल झालेला आहे. संपूर्ण रब्बी पीक धोक्यात आले व कांदा पिकाचे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरी झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी संघटना बीड जिल्हा अध्यक्ष शेख अजोमोद्दिन यांनी केली आहे.