विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र
अंबाजोगाई (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया मराठवाडा सरचिटणीसपदी रवीकिरण देशमुख यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे पत्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांना रविवार,दि.३१ मार्च रोजी देण्यात आले.
नियुक्तीपत्रात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मराठवाडा विभागाचे सोशल मिडीया प्रदेश उपाध्यक्ष डॉ.कपिल झोटींग यांनी म्हटले आहे की,रवीकिरण आबासाहेब देशमुख यांची मराठवाडा सरचिटणीसपदी निवड करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब,प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोंचविण्यासाठी आपले सहकार्य राहिल असा विश्वास व्यक्त करून निवडीबद्दल रवीकिरण देशमुख यांचे डॉ.कपिल झोटींग यांनी अभिनंदन केले आहे.
नियुक्तपत्र देताना जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पाटील, जि.प.सदस्य शिवाजी सिरसाट,अंबाजोगाई तालुकाध्यक्ष रणजित लोमटे,डिघोळअंबा गावचे सरपंच बाळसाहेब सोनवणे, अॅड.कवडे,प्रविण देशमुख आदींसहीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
रवीकिरण देशमुख हे हेमंत राजेमाने बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.माजलगाव, धारूर,केज,अंबाजोगाई व परळी तालुक्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार असून त्यांच्या निवडीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामिण तसेच शहरी भागात संघटन बांधणीसाठी व पक्ष मजबुतीसाठी होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया मराठवाडा सरचिटणीसपदी रवीकिरण देशमुख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे
माजी मंञी प्रकाशदादा सोळंके,माजी आ. अमरसिंह पंडीत, राष्ट्रवादी काँग्रेस व मिञ पक्षाचे लोकसभा उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे,माजी आ.पृथ्विराज साठे, अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख,राजेभाऊ औताडे,विलासराव सोनवणे,नगरसेवक बबनराव लोमटे आदींनी अभिनंदन केले आहे.