औरंगाबाद(प्रतिनिधी) दि.०१: औरंगाबाद जिल्यातील दहिगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पंधरा दिवसापासून पाण्याचे टँकर बंद झाले आहे.गावात आठ ते दहा दिवसाआड पाणी येत आहे.गावातील महिला,मुलींना एक ते दोन किलो मीटर अंतरावरून विहिरीतुन पानी पाणी काढुन आणावे लागत आहे.हंडाभर पाण्यासाठी रनोमाळ भटकंती करावी लागत असुन दहिगाव हे जवळपास तीन ते चार हजार लोकवस्ती असलेले गाव आहे.येथील लोकाना मागील चार महिन्यापासून भयानक पाणीटंचाई जानवायला लागली आहे. गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींने तळ गाठल्याने असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.गावातील हातपंपही कोरडे पडले आहेत.अजुन तर पूर्ण उन्हाळा जायचा आहे.ग्रामपंचायतने वेळीच उपाययोजना न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे,या तिव्र पाणीटंचाई विरोधात रविवारी सकाळी गावातील महिलांनी ग्रामपंचायत विरोधात घोषणाबाजी देत हंडा मोर्चा काढुन ग्रामपंचायतला टाळे ठोकले आहे.पाणीप्रश्न न सोडवल्यास पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढुन कुलुप,आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे .
या हंडा मोर्च्यामध्ये गावातील शेकडो महिला, नागरिक सहभागी झाले होते, यावर्षी जुन-जुलै पासुनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असुन टँकरद्वारे किंवा वेगळ्या मार्गाने पाणीपुरवठा करण्यात यावा नाहीतर एखादी विहीर अधिग्रहण करुन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी मागणी केली आहे.