बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी जिल्हयातील सामाजिक संघटना सरसावल्या ;पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

बीड दि.०१(प्रतिनिधी): बीड जिल्हयाच्या राजकारणात पालकमंत्री म्हणून काम करताना ना. पंकजाताई मुंडे यांनी अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेवून जिल्हयाचा सर्वांगिण केलेला विकास ‘याचि देहि याची डोळा’ सामान्य लोकांच्या दृष्टीक्षेपात दिसत असल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांना विजयी करण्यासाठी समाजातील विविध सामाजिक संघटना पुढे आल्या असून काल ना.पंकजाताईंच्या उपस्थितीत अनेकांनी भाजपात प्रवेश केला. ज्यामध्ये शाहिर परिषद, गोंधळी समाज तथा महिला बचत गट संघटना यांच्या पदाधिकार्‍याचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अठरा पगड जाती धर्माचे लोक आता महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी पुढे येताना दिसत आहेत. विरोधक जातीपातीच्या आधारावर निवडणुकीला वळण देत असताना सामान्य माणूस मात्र मुंडे भगिंनीनी केलेल्या विकासकामाला प्रतिसाद देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून समाजातील गोरगरीब, कष्टकर्‍यासाठी जे लोक पुढे येतात तेच आता निवडणुक प्रचारात सहभागी होण्यासाठी पुढे सरसावलेले दिसत आहेत. प्रचार दरम्यान ना.पंकजाताई मुंडे जनतेच्या दरबारात जावून आपण केलेल्या विकासाचा लेखाजोखा सांगत असल्याने व बीड जिल्हयात झालेली कामे लोकाना दिसत असल्याने मुंडे भगिनींच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे. काल ना.पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा मराठी शाहिर परिषदेचे जिल्हा अध्यक्ष कैलास काटे, शाहिर ठोंबरे, शाहिर नवनाथ धन्वे, शाहिर दामू पायळ व इतर या शिवाय गोंधळी समाजाचे श्री अजय लांडगे, लोकजनशक्ती तालुकाध्यक्ष बाळासाहेब राऊत व बीड जिल्हा महिला बचत गट संघटना संस्थापक अध्यक्ष संजय होळकर यांनी भाजपात प्रवेश केला. या वेळी बोलताना संजय होळकर म्हणाले की, ना.पंकजाताईंचे नेतृत्व आमच्या गोरगरीबांसाठी एक आशेचा किरण असून बीड जिल्हयात महिला बचत गटाची महाचळवळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभी राहिली असल्याने घरोघरी महिला सक्षमीकरण मोठया प्रमाणावर होत आहे. या शिवाय बीड जिल्हयाच्या विकासासाठी पंकजाताई देत असलेले योगदान स्वतंत्र्यानंतर त्यांच्याच नेतृत्वावर सिध्द झाले असून आम्हा अठरा पगडी जाती धर्माच्या लोकांचा सर्वांगिण विकास त्यांच्यामुळे होत आहे. उद्या होत असलेले लोकसभा निवडणुकीत प्रितमताईंच्या विजयासाठी जिवाचे रान करून त्यांना प्रचंड मतानी विजयी करू हा विश्‍वास त्यांनी बोलून दाखवला. या वेळी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सभापती संतोष हंगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलीक खांडे, रासपा नेते बालासाहेब दौडतले, सचिन मुळुक, बालाजी पवार, बाळासाहेब अंबुरे आदि मान्यवरांसह अनेकांची उपस्थिती होती.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.