औरंगाबाद जिल्ह्यात एक लक्ष 45 हजार 916 कोरोनामुक्त, 71 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि.०९: औरंगाबाद जिल्ह्यात आज 08 जणांना (मनपा 06, ग्रामीण 02) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 916 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 06 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 633 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 646 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 71 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (06)

बुढ्ढी लाइन 1, बीड बायपास 1, अन्य 4