औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यसोयगाव तालुका

सोयगाव-बनोटी-अजिंठा गाव मार्गावर धावल्या सोयगाव आगारातून दोन बसेस ;उत्पन्न मात्र ५६० रु

सोयगाव,दि.१०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कर्मचाऱ्यांचा तब्बल संपाच्या ३३ व्या दिवशी सोयगाव आगारातून पोलीस बंदोबस्तातून अजिंठा गाव आणि बनोटी मार्गावर शुक्रवारी दोन बसेस धावल्या परंतु उत्पन्न कमी आल्याने पुन्हा परिवहनची डोकेदुखी वाढली आहे.दरम्यान बनोटी मार्गावरून धावणाऱ्या बस मध्ये चक्क पोलीस बसमध्ये बंदोबस्तात प्रवास करून गेला होता.

परिवहनचे कर्मचारी विलीनीकरणसाठी संपाच्या निर्णयावर ठाम असतांना मात्र दुसरीकडे प्रवाशांना पुन्हा बसच्या प्रवासासाठी वळविण्यासाठी परिवहन कडून प्रयत्न होत आहे.त्यासाठी सोयगाव आगारातून पोलीस बंदोबस्तात बनोटी आणि अजिंठा गाव या मार्गावर दोन बसेस मार्गस्थ झाल्या होर्त्या सोयगाव बसस्थानकावर सोयगाव पोलिसांनी अजिंठा गाव बसला संरक्षण दिले परंतु बस सोयगाव पोलिसांच्या हद्दीतून निघून गेल्यावर पुढील मार्गावर फर्दापूर पोलिसांनी या बसला संरक्षण दिले होते आगार प्रमुख हिरालाल ढाकरे यांनी खुद्द या बसमध्ये प्रवास केला व बनोटी मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये थेट पोलीस कर्मचाऱ्याने प्रवास करून प्रवाशांना संरक्षण दिले दोन्ही बसेसचे उत्पन्न मात्र ५६० रु इतके मिळाल्याने कमी उत्पन्नाची डोकेदुखी वाढली आहे.

पोलिसाचा बसमध्ये प्रवास-

सोयगाव-बनोटी मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये सोयगाव पोलीस ठाण्याचा थेट पोलीस कर्मचारीच बंदोबस्तात प्रवास करून गेला होता.या बसचे २६० रु इतके उत्पन्न हाती आले असल्याची माहिती आगार प्रमुख हिरालाल ढाकरे यांनी दिली तर अजिंठागाव बसला ३०० रु इतके उत्पन्न मिळाले आहे

Back to top button