औरंगाबाद, दि.10: सामाजिक न्याय विभागाच्या पद्मपुऱ्यातील 1000 मुला, मुलींचे विभागीय शासकीय वसतीगृह, युनिट क्रमांक 4 येथे शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. अर्ज वाटप व अर्ज स्वीकृती प्रक्रिया 07 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत आहे. प्रवेश अर्ज विनामुल्य आहे. तरी जिल्ह्यातील मागास प्रवर्गातील इच्छुक विद्यार्थींनी वसतिगृह प्रवेशासाठी 1000 मुला, मुलींचे विभागीय शासकीय वसतिगृह, युनिट क्रमांक 4 पद्मपुरा, औरंगाबाद या ठिकाणाहून अर्ज घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायाकिंत प्रतींसह विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन गृहपाल एस.एम.कांबळे यांनी केले आहे.