औरंगाबाद, दिनांक 10: दिव्यांगाबाबतचे राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग संशोधन समिती गठीत करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत व नामवंत व तज्ञ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगांचे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांची नावे शासनास सादर करावयाची आहेत. तरी राज्य सल्लागार मंडळावर अशासकीय सदस्यांकरीता करावयाचा अर्ज 13 डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे. सदर अर्ज उपलब्ध करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.एन. केंद्रे यांनी केले आहे.
प्राप्त केलेले अर्जातील माहिती भरुन आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तीन प्रतीत प्रस्ताव 16 डिसेंबरपर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद यांचेकडे सादर करावा, असेही त्यांनी कळविले आहे.