संभाजीनगर (ता.10) : शिवसेना पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 12 डिसेंम्बर 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत, जैस्वाल मंगल कार्यालय, अहिल्याबाई होळकर, रेल्वे स्टेशन रोड, कोकणवाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंर्तगत मोफत शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सर्व सामान्य लोकांना या योजनेचा फायदा आणि माहिती व्हावी तसेच बऱ्याच रुग्णाना मोठे आजार झाल्यानंतर त्यांना उपचार करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसते त्यामुळे त्यांना उपचार करता येत नाही, यासाठी उपचार करता यावे म्हणून योजनेच्या माध्यमातून ह्दयविकार, कर्करोग, मेंदूचे आजार, पोटाचे आजार, अंजिओप्लॅस्टी, किडनीचे आजार, पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया, लहान मुलांचे आजार, महिलांचे आजार अशा वेगवेगळ्या स्पेशालिटीचे 1205 आजाराच्या शस्त्रक्रिया व उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनाच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत.
या शिबिराला उदघाटक म्हणून आमदार संजय शिरसाट, प्रमुख उपस्थिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे आमदार प्रदीप जैस्वाल माजी आमदार किशनचंद तनवाणी, उपजिल्हाप्रमुख राजू राठोड महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृहनेता विकास जैन, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, गिरजाराम हाळनोर, गजानन बारवाल, शिल्पाराणी वाडकर, शहरप्रमुख विजय वाकचौरे, डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ.आशिष देशपांडे उपशहरप्रमुख राजू राजपूत, संजय बारवाल, रमेश बाहुले, डॉ. पांडुरंग वट्टमवार, डॉ. वीरेंद्र वडगावकर, डॉ. सचिन सानप, डॉ.धनंजय घुगे, यांची उपस्थिती असणार आहे.
तसेच डॉ. अजय रोठे, डॉ. श्रुती तोष्णीवाल, डॉ. पायल चोबे, डॉ. नितीन चित्ते, डॉ. सोनल लाठी, डॉ. प्रकाश पायमोडे यांचे या शिबिराला विशेष सहकार्य लाभणार आहे. आणि या शिबिराचा सर्व नागरीक, महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक शिवसेना उपविभागप्रमुख अनिल बिरारे, विजय पैठणे, गणेश सोनवणे, राजन गरबडे यांनी केले आहे.