नागपूर : सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणूका जवळ आल्या आहेत काही जागेवर प्रचारही सुरू आहे.मात्र नागपूर मधून एक नवीन वादग्रस्त विधान समोर आलं आहे.पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. “स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करतात, मात्र संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही” असं वक्तव्य जयदीप कवाडे यांनी केले आहे.
काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांची प्रचारसभा नागपूरमधील बगडगंज भागात झाली. या सभेत जयदीप यांनी भाषणादरम्यान स्मृती इराणींना उद्देशून खालच्या पातळीवर टीका केली. जयदीप यांचे भाषण संपल्यानंतर नाना पटोले यांनी जयदीप कवडेंना बाजूला बसवून शाबासकीही दिली.
निवडणूका जवळ आल्या की टिका होतच असतात परंतु टीका करताना सर्वच नेत्यांनी वक्तव्य करताना मर्यादा पाळल्या पाहिजेत. कारण काही अक्षेपार्ह टीकांनी वाद निर्माण होण्याची शक्यता आसतात.