सोयगाव,दि.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी छाननी दरम्यान पात्र झालेल्या ४६ उमेदवारांपैकी सोमवारी माघारीच्या दिवशी सहा उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतल्याने चाळीस उमेदवार रिंगणात राहिले आहे.त्यामुळे प्रभाग क्रमांक बारा वगळता सर्वच प्रभागात तिरंगी लढत रंगली असून प्रभाग बारा मध्ये दोन अपक्षांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या प्रभागातील चुरस वाढली आहे.अपक्षांच्या उमेदवारी अर्जांमुळे प्रभाग बारा मध्ये बहुरंगी लढती रंगल्या आहे.माघारीच्या दिवशी सोयगाव नगरपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून मंगळवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीव मोरे ,तहसीलदार रमेश जसवंत यांनी संयुक्तपणे दिली आहे.
सोयगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा-१३.शिवसेना-१३ राष्ट्रवादी कॉंग्रेस-पाच,कॉंग्रेस-सहा,प्रहार-१ आणि अपक्ष-२ अशी उमेदवार संख्या रिंगणात राहिलेली असून माघारीच्य दिवशी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे.यामध्ये कॉंग्रेसकडे सहा तर राष्ट्रवादीकडे पाच जागा वाट्याला आल्या आहे.सोमवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी संजीव मोरे ,तहसीलदार रमेश जसवंत,मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी,सहायक भगवान शिंदे,नायब तहसीलदार विठ्ठल जाधव आदींनी प्रक्रिया पूर्ण केली.